Ticker

6/recent/ticker-posts

माण मतदार संघात परिवर्तन करण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार


वडूज/दहिवडी : प्रतिनिधी माणमध्ये यंदा परिवर्तन होणारच असा नारा देत महाविकास आघाडीने निवडणूकीचा बिगुल वाजवला. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. 
माण मतदारसंघात सुरुवातीपासूनच अनेक नाट्यमय घटना घडामोडी घडल्या. प्रभाकर देशमुख यांनी स्वतः पुढाकार पत्रकार परिषद घेवून शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही माण मतदारसंघात तुतारी वाजवू असे सांगितले. 
यावेळी उमेदवार प्रभाकर घार्गे यांनी सांगितले की माण-खटाव मध्ये विकास करत असताना कायद्याचा चुकीचा वापर करुन सुरु असलेली दहशत आपल्याला संपवायची आहे. मतदारसंघातील दिशाहीन राजकारण मोडीत काढण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची माझी तयारी आहे. पैशावर मते देणारा लाचारांचा तालुका हा कलंक आपल्याला पुसून काढायचा आहे. स्वाभिमानी मतदारसंघ आपल्याला पुन्हा उभा करायचा आहे. 
प्रभाकर देशमुख म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते प्रभाकर घार्गे यांना विजयी करुन या मतदारसंघात सर्वांना अपेक्षित असलेला बदल घडवून आणतील. काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे स्पष्ट केले.

प्रभाकर घार्गे यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करु असे नंदकुमार मोरे, संदीप मांडवे यांनी सांगितले. तर स्वाभिमानीच्या अनिल पवार यांनी सांगितले की आम्ही भाजपच्या शेती विरोधी धोरणाविरोधात लढत असताना इथली आमची उमेदवारी महाविकास आघाडीला हानीकारक ठरेल म्हणून राजू शेट्टी यांच्या आदेशानुसार आम्ही उमेदवारी माघारी घेतली असून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी पुर्ण ताकदीने लढू.

यावेळी सुरेंद्र गुदगे, मनोज पोळ आदी मान्यवर उपस्थित होते. अनिल देसाई यांनी स्वागत केले तर अभयसिंह जगताप यांनी आभार मानले.
........
चौकट : खटाव तालुक्यातील नंदकुमार मोरे, संदीप मांडवे व अनिल पवार निवडणूकीच्या मैदानात उतरल्याने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभाकर घार्गे यांची अडचण वाढली होती. मात्र या तिघांनी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आपले उमेदवारी अर्ज काढल्याने महाविकास आघाडीचे बळ वाढले आहे.

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या