Ticker

6/recent/ticker-posts

मीडियाची संवाद साधने आणि स्वसंवाद ऑनलाइन चर्चासत्र संपन्न :



 वडूज /प्रतिनिधी: येथील प्रजापती  ब्रह्मकुमारी सेंटर मीडिया प्रभाग, राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठान, माऊंट आबू यांचे वतीनं "मीडिया ची संवाद साधने व स्वसंवाद"या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार व माध्यमकर्मी साठी ऑनलाइन चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात ब्रह्मकुमारी संस्थेचे

राष्ट्रीय कोर कमिटी सदस्य, जळगांव, उत्तर महाराष्ट्र, तथा मीडिया विंग प्रमुख प्रा.डॉ.सोमनाथ वडनेरे मुख्य संबोधक,कार्यक्रम अध्यक्षा ब्रह्माकुमारी सुनंदादीदी, उपक्षेत्रिय निर्देशिका
ब्रह्माकुमारीज् उपक्षेत्र पुना, कार्यक्षेत्र कोल्हापूर तर खटाव तालुक्याच्या वतीनं माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा बंडा गोडसे, पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर व जिल्हा कार्याध्यक्ष डॉ विनोद खाडे यांनी सक्रीय सहभाग घेतला.
या संवादात बोलताना प्रा. डॉ. वडनरे म्हणाले, आपण मीडियाच्या नवीन व आधुनिक संवाद साधनांनी सुपरिचित आहोत. ज्यात मोबाईल, सोशल मीडिया, वेब आदिंचा समावेश होतो. खरे तर ही संवाद साधने म्हणून ओळखली जातात. परंतु त्यांनी प्रत्येकाच्या मनाचा ताबा निश्चितपणे मिळविला आहे. मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि सायबर प्रत्येक मीडियाच्या क्षेत्रात अमूलाग्र बदल होवून संवादाच्या नवीन साधनांची नित्य भर पडत आहे. या नवसाधनांच्या भाऊगर्दीत ‘संवाद’ वाढला मात्र ‘स्वसंवाद’ कमी झाला हे नाकारुन चालणार नाही.प्रा. बंडा गोडसे म्हणाले ,सद्य परिस्थितीत मीडियाची ही नवीन साधने तर हाताळावी लागतीलच परंतुच्या या नवीन प्रवाहात स्वसंवाद आणि सुसंवाद नित्य होणे गरजेचे आहे. नव्हे मानसिक स्वास्थ्यासाठी तर हे अत्यावश्यकच आहे. यावेळी त्यांनी वडूज सेंटरचे नियमित उपक्रम व सामाजिक बांधिलकी चे कौतुक केले.  सुनंदा दीदी यांनी मार्गदर्शन केले.
राजयोग मेडिटेशन:ब्रह्माकुमारी शोभा बहनजी, संचालिका इस्लामपूर सेवाकेंद्र यांनी केलं.झूम व यु ट्यूब माध्यमातून संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजनब्रह्माकुमारी राणी बहनजी ,संचालिका, ब्रह्माकुमारी वडूज सेवाकेंद्र यांच्या वतीने करण्यात आले होते.                                                                        फोटोओळी: वडूज :  मीडिया ऑनलाईन चर्चा सत्र उद्घाटन प्रसंगी दीपप्रज्वलन करतांना प्रा. बंडा गोडसे, राणी बहेनजी, धनंजय क्षीरसागर,डॉ. खाडे व 
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या