सातारा-स्वप्निल जाधव
रहिमतपूर पोलिस ठाणे हद्दीत साप ता. कोरेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेच्या दिनांक 19/10/2020 रोजी 01.15 वाढदिवसाच्या.चे सुमारास टेबल ङाॅवर मधील रक्कम रूपये 5500/- व इतर कागदपत्रे चोरीस गेलेने व पतसंस्थेची तिजोरीवर फ़ोङन्याचा प्रयन्त झाल्याने, रहिमतपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.बल्लाळ यांनी पोलिस नियंत्रण कक्षा माफ॔त श्वान पथकास प्राप्त होताच येथील पोलिस हवालदार जी.ङी.मोरे बनं.11,पो कॉ. व्ही.एस जाधव बनं 1243, चालक पो कॉ.व्ही.एस.निकम हे श्वानसह घटनास्थळी पोहोचले.
सदर पथकाने श्वानसह पाहनी केली असता, घटनास्थळी संशयित आरोपीची एक गोधङी मिळून आल्याने सदर गोधडीचा वास श्वान रिओ यास दिला असता श्वान ने पतसंस्थेच्या समोरील ङांबरी रस्त्याने दक्षिणेस 25 ते 30 मीटर अंतरावर जावून ङांबरी रस्त्यालगत एका झुडपात टाकलेली कटावनी शोधून काढली .श्वान रिओ यांस सदर गोधडीचा पुन्हा वास दिला असता श्वानने पुढे 80 ते 100 मीटर अंतरावरील साप गावातील एस.टी.स्टॅङ चौका पासून पुढे उजव्या बाजूस पश्चिमेस साप ते रहिमतपूर रोड वरील महाविर मारूती कांबळे यांचे घरा शेजारी रस्ताने दक्षिणेस वळून 20 ते 25 मीटर अंतरावर जावून एका बंद घराचे दरवाजा जवळ जावून थांबला.पुन्हा एकदा श्वान ला गोधडीचा वास दिला असता श्वान बंद घराच्या दरवाजा जवळ जावून थांबला.
त्यानंतर प्रभारी अधिकारी रहिमतपूर पोलिस ठाणे यांनी तपासाअंती सदरचे घर सचिन जनाध॔न वाघमारे यांचे असल्याचे समजले,श्वानने संशयित गुन्हेगाराच्या घरापर्यंत माग काढून गुन्हा उघडकीस आणून मोलाची कामगिरी बजावली आहे.तसेच श्वान रिओ चे हस्तक पो हवा जीङी मोरे,पो कॉ व्ही एस जाधव व चालक पो कॉ व्ही एस निकम यांनी घटनास्थळी पोहचून उत्कृष्ट कामगिरी केली.

0 टिप्पण्या